भक्तीचि वेळ भक्तीचि वेळ
मला सदैव आवडेल
मी टाकी चिंता सगळी
व जाई बापाजवळी
ती संकटाच्या समयी
देईल शक्ती हृदयीं
तै मोहपाशी ही टळेल
अमोल्य ती भक्तीचि वेळ
भक्तीचि वेळ भक्तीचि वेळ
हि गोड कैशी वर्णवेल
करी मला ती प्रेरणा
देवा मी अर्पी प्रार्थना
त्या ठायी भाव ठेवूनी
व भार सर्व टाकुनी
कृपा अनंत तै मिळेल
हि धन्य हो भक्तीचि वेळ
भक्तीचि वेळ भक्तीचि वेळ
जीवा आधारही लाभेल
देहांतुनी सुटुनिया
जाई वरी चढूनिया
पवित्र होति भावना
समाप्त सर्व प्रार्थना
तै जयकार हो गर्जेल
सफळ हि भक्तीचि वेळ